HRA : राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही ! प्रशासनांकडून कडक कार्यवाही !

राज्य शासन सेवेतील ग्रामीण विकासांशी निगडीत कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळण्याकरीता आता मोठी अडचणी निर्माण होत आहेत .या संदर्भात प्रशासनांकडून कडक कार्यवाही करण्यात येत आहेत .घरभाडे भत्ताचा लाभ घेण्याकरीता आता कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहणे बंधनकाकर असणार आहे .जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नाहीत अशा कर्मचाऱ्यांना आता यापुढे घरभाडे भत्तांपासून मुकावे लागणार आहे .

विधिमंडळांमध्ये आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्ट केले की , राज्यातील शिक्षकांना दरवर्षी 2 हजार कोटी रुपये घरभाडे भत्ता म्हणून दिले जाते . जे कि , शिक्षक कामाच्या ठिकाणी वास्तव न करता घरभाडे घेत असतात . यामुळे कामाच्या ठिकाणी वास्तव्यास न रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन घरभाडे भत्ताची रक्कम कपात करण्याची मागणी यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी केली .

यामुळे आता प्रशासनांकडून कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन घरभाडे भत्ताची रक्कम कपात करण्यात येणार आहे .या संदर्भात ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय देखिल निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयान्वये शिक्षक , ग्रामसेवक , कृषीसेवक ,तलाठी  अशा ग्रामविकासांशी निगडित कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करण्याकरीता घरभाडे देण्यात येता . घरभाडे घेण्याकरीता सरपंच तसेच ग्रामसभेचा दाखला घेणे असणार आहे .

Leave a Comment