New Pay Commission:  कर्मचाऱ्यांना DA वाढीसह पगारात मोठी वाढ ! सरकारकडून मोठा निर्णय !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत डी.ए वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेयक करण्यात येणार आहे .त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी मोठी वाढ करण्यात येणर असल्याने , कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे .

महागाई भत्ता 42 % – केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून महागाई भत्तामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे 4 टक्के वाढ करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे . परंतु याबाबतचा अधिकृत्त निर्णय ( ऑफीस मेमोरिंडम ) निर्गमित झालेला नाही . मिडीया रिपोर्टनुसार वाढीव महागाई भत्ताबाबतचा अधिकृत्त निर्णय मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे .

महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे , केंद्र सरकारने डी.ए वाढीची घोषणा करताच राज्य सरकार देखिल डी.ए वाढीची घोषणा करेल .डी.ए वाढ जानेवरी 2023 पासून होणार असल्याने , कर्मचाऱ्यांना डी.ए फरकाचा लाभ देखिल मिळणार आहे .

नवा वेतन आयोग ( 8 th Pay Commission ) – केंद्र सरकारच्या अहवालानुसार , सध्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतन मिळते . यामध्ये 1.11 टक्के वाढ करण्याची केंद्रीय कामगार युनियन कडुन करण्यात आलेली आहे . म्हणजेच एकुण फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्केने देण्याची मागणी करण्यात आलेली आहे .

फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 टक्के वाढ झाल्यास , कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होईल , केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 18,000/- वरुन 26,000/- होईल .तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्या किमान मुळ वेतन 15,000/- रुपये आहे यामध्ये वाढ होवून किमान मुळ वेतन 21,100/- रुपये होईल .

Leave a Comment