आनंदाची बातमी ! महाराष्ट्र शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना लागु होणार जुनी पेन्शन ! दिलासादायक निर्णय !

केंद्र सरकारने नुकतेच जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे . सन 2004 पुर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिलेली आहे . अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . केद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील विविध राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना लागु होण्याच्या अगोदर परीक्षा दिलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येत आहे .

महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल याबाबत योग्य पाऊल उचलेले आहे .केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये , सन 2005 पुर्वी परीक्षा दिलेल्या पैकी ज्या कर्मचाऱ्यांना 2005 नंतर शासन सेवेत रुजु करुन घेण्यात आले अशा कर्मचाऱ्यांना नविन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे .

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग 2003 मध्ये उत्तीर्ण 700 उमेदवारांना राज्य शासनांने 2007 मध्ये नियुक्ती दिलेली आहे . अशा कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागु होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे .त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2005 पुर्वी परीक्षा दिलेली आहे , परंतु त्यांना सन 2005 नंतर शासन सेवेत नोकरी मिळालेली आहे .

अशा कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून योग्य तो निर्णय घेण्यास राज्य सरकार सकारात्मक असल्याची बाब समोर आली आहे.

Leave a Comment