राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदली बाबत राज्याचे उपसचिव यांच्याकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित झालेला आहे .सदर बदली संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूया ..
राज्य शासनाच्या बदली संदर्भात दिनांक 07.04. 2021 रोजी च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे . सद्यस्थितीत संगणकीय प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांची कार्यवाहीचे वेळापत्रक सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे .सदर बदली प्रणालीमध्ये अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे .
शासन निर्णय दिनांक 07.04.2021 मधील विशेष संवर्ग एक शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे . परंतु बदली प्रक्रिया राबवताना विशेष संवर्ग एक मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळणे बाबतचा पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्प्यात समाविष्ट झालेले आहेत . तसेच विशेष संवर्ग एक मधील ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत तीन वर्षापेक्षा कमी झालेली आहे अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणे बाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही . अशा विशेष संवर्ग एक मधील शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही .अशी निवेदने विविध शिक्षक संघटनांकडून शासनास प्राप्त झालेले आहेत .
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मधील ज्या शिक्षकांनी यापूर्वी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय स्वीकारलेल्या नाही . अशा संवर्ग एक मधील शिक्षकांना बदलीसाठी होकार / नकार देण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहे . तसेच सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या इतर सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांचा प्रसंतीक्रम भरण्याची संधी देखील देण्यात येत आहे .
सदर बदली प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी सुधारित वेळापत्रक सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेला आहे . सदर बदली प्रक्रिया संदर्भातील शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .